पक्षी मित्र आष्पाक आत्तार यांच्या घरी मयूर राजाचे नियमित दर्शन

शिराळा, दि.17 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – नथुराम कुंभार) पूर्वी ग्रामीण भागात आणि जंगल परिसरात मोरांचे नित्यनियमाने दर्शन व्हायचे. मोर हा पक्षी अबाल वृद्धासह सर्वांचा आकर्षण असायचा. पहाटेच्या वेळी येणार मोराचा आवाज सर्वांचे लक्ष वेधून घ्यायचा त्यामुळे दहा पंधरा वर्षापुर्वी तो एक दुर्मिळ क्षण असायचा. मात्र सध्या चांदोली परीसरातील वाढत्या नैसर्गिक वाढत्या वनसंपदेमुळे मोरांची संख्याही वाढु लागली असुन येथील लोकवस्तीतुन मोरांचा संचार वाढला असुन वारणावती (ता. शिराळा) येथील पक्षीमित्र आष्पाक आत्तार यांच्या अंगणात दररोज सकाळी मयूर राजाचं आगमन होत असुन डौलदारपणे बागडणारा व दाणे टिपणारा मोर सर्वांचे तो लक्ष वेधून घेत आहे.