‘पडदा’ ने पटकवला आर. आर. करंडक

तासगाव, दि.21 फेब्रुवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) स्व.आर आर आबा पाटील यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित आर आर करंडक खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत ठाणे येथील ज्ञानसाधना नाट्यपरिवार यांनी सादर केलेल्या “पडदा” या एकांकिकेने प्रथम क्रमांक मिळाला. पहिल्याच वर्षी आयोजित या स्पर्धेतील मानाचा करंडक या संघाने पटकवाला. राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित दादा आर आर पाटील यांच्या संकल्पनेतून आणि स्व.आर आर पाटील आबा प्रतिष्ठान यांच्या वतीने येथील साने गुरुजी नाट्यगृहात या स्पर्धा पार पडल्या. यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत संपूर्ण राज्यभरातील २३ संघांनी सहभाग घेतला. ज्ञानसाधना नाट्यपरिवार ठाणे यांनी सादर केलेल्या “पडदा” या एकांकिकेला प्रथम क्रमांक मिळाला. द्वितीय क्रमांक डावा क्रिएशन अलिबाग यांनी सादर केलेल्या “मेन एन ब्लॅक” या एकांकिकेस मिळाला.तर तृतीय क्रमांक कलासक्त मुंबई “ओल्या भिंती” आणि विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर यांनी सादर केलेल्या “चफी” या दोन्ही एकांकिकेस विभागून मिळाला. उत्कृष्ट अभिनय स्त्री-राजश्री जमदाडे(ओल्या भिंती), पुरुष-अनिकेत कदम (समांतर), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक-अजय पाटील(पडदा), सर्वोत्कृष्ट लेखक सोमनाथ सोनवलकर(ओल्या भिंती), सर्वोत्कृष्ट पाश्र्वसंगीत-ऋषीकेश देशमाने(चफी), सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना-राजेश शिंदे(टीनिटस), सर्वोत्कृष्ट नैपथ्ययोजना-वेदांत पावसकर, ममता गुप्ता(मैय्या), सर्वोत्कृष्ट रंगभूषा-केदार ओठवणेकर(यासणी मायणी यासले) यांना प्रदान करण्यात आला. विजयी संघ व कलाकारांना माजी नगराध्यक्ष अमोल शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष गजानन खुजट, युवक अध्यक्ष अभिजित पाटील, ग्रामपंचायत सदस्य विकास म्हस्के, महिला अध्यक्षा नलीनी ताई पवार, माजी नगरसेविका शुभांगी साळुंखे, यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. परीक्षक म्हणून बाळ बरगाले, कुरणे सर यांनी काम पाहिले. स्पर्धेचे संयोजन आर आर पाटील युवा प्रतिष्ठान चे संयोजक राहुल जाधव आणि मुस्ताक गवंडी यांनी केले.