शिराळा, दि.22 फेब्रुवारी 2023 (नथुराम कुंभार, महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) शिराळा तालुका डोंगरी साहित्य परिषद, शब्दरंग साहित्य मंडळ आणि पणुब्रे वारुण येथील साहित्य रसिक यांचे संयुक्त विद्यमाने बुधवार दि. १ मार्च रोजी अकरावे डोंगरी साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनाचे अध्यक्षपद प्रख्यात विचारवंत, संत साहित्याचे अभ्यासक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे विद्यमान अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे पुणे हे भूषवणार आहेत. कवी संमेलनाचे अध्यक्षपदी विटा येथील प्रसिद्ध कवी रघुराज मेटकरी आहेत. अशी माहिती डोंगरी व शब्दरंगचे अध्यक्ष कवी वसंत पाटील व स्वागताध्यक्ष हणमंतराव पाटील यांनी यांनी दिली. हे संमेलन पणुब्रे वारुण ता. शिराळा येथील जोतिर्लिंग माध्यमिक विद्यालयाचे मैदानावर होत आहे. सकाळी दहा वाजता ग्रंथदिंडीने संमेलनलनाची सुरुवात होत असून चार सत्रात होणाऱ्या संमेलानाचे उदघाटक खासदार धैर्यशील माने तर प्रमुख पाहुणे सत्यजित देशमुख, हे आहेत. दुसऱ्या सत्रात सुरत येथे कार्यरत असलेले प्रसिद्ध उदयोजक बळीराम पाटील चरणकर यांचे अध्यक्षते खाली, संमेलनाध्यक्ष डॉ.सदानंद मोरे, ज्येष्ठ कवी प्रा.प्रदीप पाटील, कडेगाव विभागाचे प्रांताधिकारी, साहित्यिक गणेश मरकड, शिराळा तहसीलदार गणेश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते तानाजीराव पाटील यांचे उपस्थितीत उत्कृष्ठ साहित्य निर्मितीचे पुरस्कार वितरण होणार आहे. तिसऱ्या सत्रात ज्येष्ठ कथाकार सुधीर कुलकर्णी सांगली हे कथाकथन सत्राचे अध्यक्षआहेत. प्रसिद्ध ग्रामीण विनोदी कथाकार हिंम्मत पाटील, कथाकार जगन्नाथ माळी पेठ हे सहभागी होत असून प्रमुख उपस्थितीत साहित्यिक सुरेश आडके कणेगाव हे आहेत. दुपारी साडेचार वाजता प्रसिद्ध कवी रघुराज मेटकरी यांचे अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवीसंमेलन होणार आहे. यामध्ये प्रा.मनीषा पाटील- हारोलीकर, सुभाष कवडे, माधुरी मरकड, प्रा.उमाकांत बेस्के, विशाखा विशाखा, तानाजीराजे जाधव, राजेंद्र टिळे, प्रा. एन डी. नाईकवडी, नथुराम कुंभार, सुनील सकटे, भगवान पाटील, रिजवाना मुल्ला, बजरंग गावडे, माणिक पाटील, भीमराव कुंभार, संजय शेवाळे, अंजली लोहार, वनिता जांगळे आदी कवी सहभागी होणार असून सुभाष कवडे सूत्रसंचलन करणार आहेत. यावेळी डोंगरी साहित्य परिषदेचे मन्सूर नायकवडी, प्रकाश जाधव, सचिन पाटील, अविनाश जाधव, श्रीरंग किनरे, बिपीन पाटील, प्रतापराव शिंदे, विश्वास आमणे आदी उपस्थित होते.

