पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरणी तासगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने निषेध

पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

प्रांतअधिकरी समीर शिंगटे व पोलिसांना निवेदन

तासगाव, दि.10 फेब्रुवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा)
राजापूर (जि.रत्नागिरी) येथील महानगर टाईम्सचे पत्रकार शशिकांत वारीसे यांची महेंद्रा थार गाडीने अपघात घडवून हत्या केल्या प्रकरणी तासगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने निषेध करण्यात आला.

याप्रकरणी हत्या करणाऱ्यांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून दोषींवर जलदगती न्यायालयामार्फत कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. मागणीचे निवेदन मिरज प्रांत अधिकारी समीर शिंगटे आणि तासगाव पोलीस ठाणे यांना निवेदन दिले. यावेळी पत्रकार संघांचे अध्यक्ष विष्णू जमदाडे, पत्रकार दिलीप जाधव, मिलिंद पोळ, संकेत पाटील व संजय माळी उपस्थित होते.