पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालयाच्या प्रबंधक पदी एम.बी.कदम यांची निवड

तासगाव, शुक्रवार दि.11 ऑगस्ट 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) ‘ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षणप्रसार’ या ब्रीदवाक्याने कार्यमग्न असणाऱ्या श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या तासगाव येथील पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात प्रबंधक या पदावर श्री.एम.बी.कदम यांची पदोन्नती झाली. याबद्दल श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सेवक, सांगली विभाग प्रमुख व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांनी त्यांचा सत्कार केला. एम.बी.कदम यांनी संस्थेच्या विविध शाखांत आपली सेवा बजावली आहे. अधीक्षक पदाचा अनुभव असणारे एम. बी.कदम हे प्रबंधक या पदाला न्याय देतील असा विश्वास प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी सत्कार समारंभ प्रसंगी बोलताना काढले. यावेळी प्रा.आर.एस.मोटे, प्रा.प्रकाश खाडे, डॉ.शहाजी पाटील, प्रा.डी.व्ही.पाटील यांनी आपल्या मनोगतातून त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्टाफ सेक्रेटरी प्रा.ए.आर.पाटील यांनी केले तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.आण्णासाहेब बागल यांनी मानले. यावेळी उपप्राचार्य जे.ए.यादव व डॉ. एस.के.खाडे , श्री.आप्पासाहेब लावंड यांसह महाविद्यालयातील विविध विभागाचे विभागप्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय सेवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.