पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते हिंदवी स्वराज्य महोत्सवाचे उद्घाटन

शिवकालीन बाजारपेठेत पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांची खरेदी, तरपा नृत्यामध्ये वाद्य हाती घेत धरला फेर, खरेदी केली बांबूची टोपली; तरपा नृत्यामध्ये सहभागी

पुणे, दि.18 फेब्रुवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते जुन्नर येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित हिंदवी स्वराज्य महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यादरम्यान यावेळी शिवकालीन लोक संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या ‘शिवकालिन गाव’चे उद्घाटन करण्यात आले. यादरम्यान पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याठिकाणी भेट दिली. यादरम्यान त्यांनी शिवकालीन बाजारपेठेतून टाेपली खरेदी केली. तसेच तरपा नृत्यामध्ये वाद्य हाती घेत स्वत: फेर धरत सर्वाचे लक्ष वेधून घेतले. या साेहळ्याला माेठ्या जल्लाेषात सुरुवात झाली.
यावेळी आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय, पर्यटन संचालक बी.एन. पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, उप विभागीय अधिकारी सारंग कोडेलकर, पर्यटन सहसंचालक सुप्रिया करमरकर उपस्थित होते.