पुस्तके मानवी जीवनाला दिशा देतात – प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे

वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात ‘न्यू बुक अरायव्हल’ उद्घाटन

तासगाव, दि.27 एप्रिल 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) पुस्तक हा आपला सर्वात जवळचा मित्र आहे पुस्तके मानवी जीवनाला दिशा देतात असे उद्गार प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे ग्रंथालय विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘न्यू बुक अरायव्हल ओपनिंग अँड एक्जीबिशन’ कार्यक्रमात बोलताना काढले. ते म्हणाले पुस्तके आणि चांगली माणसे लगेच कळत नाहीत त्यांना वाचावेच लागते. आपल्या ग्रंथालयात ८६००० पेक्षा जास्त पुस्तके आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या सुसज्य ग्रंथालयाचा लाभ घ्यावा.जास्तीत जास्त पुस्तके वाचून आपल्या ज्ञानाचा खजिना वाढविण्याचे आवाहन केले. यावेळी ग्रंथालय कमिटीचे चेअरमन प्रा.प्रकाश खाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल प्रा.मिनाक्षी मुसळे यांनी केले तर आभार सौ. सुनिता महाडिक यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आण्णासाहेब बागल यांनी केले.कार्यक्रमाला प्रा.विजयसिंह जाधव,प्रा. एस.आर.घोगरे, प्रा.वर्षा जगदाळे, अधीक्षक एम.बी.कदम, संजय काळे, गजानन देसाई, जयवंत मोहिते , प्रदिप कांबळे, शुभम सुवासे, राजशेखर चव्हाण, ग्रंथालय समितीचे सदस्य यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते.