वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात प्रा.एस.डी.पाटील यांचा सेवागौरव सत्कार समारंभ
तासगाव, दि. २७ एप्रिल २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) जीवन जगण्याची प्रत्येकाची एक स्वतंत्र कला असते प्रा. शिवाजीराव पाटील यांचे व्यक्तिमत्व दिलदार आहे असे उद्गार स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अजीव सेवक, सांगली विभागप्रमुख प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे प्रा.एस.डी.पाटील सेवागौरव सत्कार समारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना काढले.ते पुढे म्हणाले हे शिवाजीराव पाटलांचे व्यक्तिमत्व सर्वांशी मिळून मिसळून वागणारे हरहुन्नरी असे आहे. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असणारे प्रा.शिवाजीराव पाटील आणि पत्नी सौ.शालन पाटील या दोघांना भावी आयुष्यासाठी महाविद्यालयाच्या वतीने शुभेच्छा दिल्या.यावेळी प्रा. प्रभाकर पाटील,प्रा.जी.के. पाटील,प्रा.एस.आर पाटील, इंद्रजीत पाटील ,प्रा.दिपक पाटील , स्वामी रामानंद भारती विद्यामंदिर तासगावचे प्राचार्य व्ही.एच.पाटील यांनी आपल्या मनोगतातून शिवाजीराव पाटील यांचा जीवन प्रवास उलगडला. प्रास्ताविक ज्युनिअर विभाग प्रमुख प्रा. एस.डी.पाटील यांनी केले तर आभार विज्ञान विभागप्रमुख प्रा.के.एस.गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आण्णासाहेब बागल यांनी केले यावेळी उपप्राचार्य जे.ए.यादव, अधिक्षक एम. बी.कदम यांसह महाविद्यालयातील सर्व विभागाचे विभागप्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय सेवक वर्ग उपस्थित होते.
