बेरडेवाडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण मोठ्या उत्साहात संपन्न

बालचमुंच्या कलाविष्काराने उपस्थीत झाले मंत्रमुग्ध

शिराळा, दि.23 एप्रिल 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – नथुराम कुंभार) जिल्हा परिषद शाळा बेरडेवाडी येथे शालेय मुलांचा “सांज चिमणपाखरांची ” हा सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस वितरण समारंभ तसेच दानशूर व्यक्तींचा सत्कार समारंभ पार पडला.प्रारंभी कार्यक्रमाचे उदघाटन आरळा गावच्या विद्यमान सरपंच सौ बाळाबाई धामणकर, प्रकाश धामणकर, ग्रामपंचायत सदस्य फैयाज डांगे, समाजसेवक शंकरदादा मोहिते, आनंदा बेरडे, रामचंद्र बेरडे, भीमराव सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी स्वागत सहयोगी शिक्षिका सविता पाटील यांनी केले तसेच प्रास्ताविक मुख्याद्यापिका – सुप्रिया घोरपडे यांनी केले. स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याने राहुल पाटिल यांचा सत्कार करण्यात तसेच जि.प शाळेच्यावतिने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी सदाबहार गीते, शेतकरी नृत्य, लावणी, रेकॉर्डं डान्स, कोळीगीत देशभक्तीपर अशा विविध गीतांवर उत्कृष्टरित्या नृत्याविष्कार सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले कार्यक्रमाचे आयोजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वनिता बेरडे व व सदस्यांनी केले .सूत्रसंचालन जितेंद्र लोकरे यांनी केले या कार्यक्रमास विश्वास बेरडे, लक्ष्मण कंदारे, आनंदा कंदारे, महेश बेरडे, बाबासो बेरडे, आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.