सार्थक कंदारे राज्यात पहीला
शिराळा, दि.12 एप्रिल 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – नथुराम कुंभार) बेरडेवाडी ता. शिराळा येथील जिल्हा परिषद शाळेने समृद्धी प्रज्ञा शोध परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले. याच शाळेतील इयत्ता 2 री तील विद्यार्थी सार्थक कंदारे याने 100 पैकी 100 गुण मिळवून राज्याच्या गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकविला. केवळ पटसंख्या नऊ असणार्या शाळेचे गुणवत्ता यादीत सात विद्यार्थी चमकले आहेत.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत गुणवत्तेने इ लर्निंग सारखे अभिनव उपक्रम व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या शाळेतील मुख्याध्यापक सुप्रिया घोरपडे व उपशिक्षक जितेंद्र लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जागरूक पालक यांच्या सहकार्यातून हे नेत्रदीपक यश संपादन केले आहे. इयत्ता दुसरीचा विद्यार्थी कुमार सार्थक आनंदा कंदारे याने समृद्धी प्रज्ञा शोध परीक्षेत 100 पैकी 100 गुण प्राप्त करून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला तसेच इयत्ता पहिली प्रबुद्ध जितेंद्र लोकरे(100/92) पूर्वा एकनाथ बेरडे (100/90) यांनी पहिलीत अनुक्रमे केंद्रात प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला. इयत्ता दुसरी ओंकार दत्तात्रय बेरडे 100/90 याने केंद्रात तृतीय क्रमांक तसेच इयत्ता तिसरीतील विद्यार्थी वेदांत लक्ष्मण कंदारे 200/180 केंद्रात प्रथम, अथर्व तुकाराम धामणकर (200/170) केंद्रात तृतीय व इयत्ता चौथीचा करण भाऊ बेरडे (200/178) याने केंद्रात तृतीय क्रमांक पटकावला. यशवंत विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक सुप्रिया घोरपडे व उपशिक्षक जितेंद्र लोकरे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच केंद्रप्रमुख हरिभाऊ घोडे, शिक्षणविस्ताराधिकारी अशोक महिंद, गटशिक्षणाधिकारी अरविंद माने यांचे मार्गदर्शन लाभले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
