बेरडेवाडी शाळेत उभारली आधुनिक तंत्रज्ञानाची गुढी

शिराळा, दि.24 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा-नथुराम कुंभार) बेरडेवाडी( ता.शिराळा) येथील जिल्हा परिषद शाळेत गुढीपाडवा नूतन वर्ष मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी पुस्तके, संगणक प्रोजेक्टर , माऊस , या आधुनिक तंत्रज्ञानाची गुढी उभी करून गावातून प्रभातफेरी काढत गुढीपाडवा साजरा केला. पाहिलीसाठी दाखल झालेल्या रुद्र बेरडे, प्रीती बेरडे, ऋषिकेश बेरडे यांना पुष्पगुच्छ व पुस्तके देऊन अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. ग्रामस्थांच्या घरोघरी जाऊन मुख्याध्यापिका सुप्रिया घोरपडे व उपक्रमशील शिक्षक जितेंद्र लोकरे यांनी मराठी शाळेचे मॉडेल स्कूल चे महत्व पटवून दिले. या उपक्रमास गटशिक्षणाधिकारी अरविंद माने, शिक्षणविस्तार अधिकारी अशोक महिंद , केंद्रप्रमुख हरिभाऊ घोडे यांचे प्रोत्साहन लाभले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वनिता बेरडे व आदी मान्यवर उपस्थित होते.