भाजपा युवा मोर्चाच्या वतीने बांधकाम कामगार नोंदणी अभियान

सांगली, दि. ३० जानेवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा)

भाजपा युवा मोर्चा व कामगार आयुक्त कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील असंघटीत बांधकाम कामगारांचे नोंदणी अभियान राबविण्यात आले. या अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

युवा मोर्च्याचे प्रदेश सचिव सागर वनखंडे व जिल्हा सरचिटणीस दिगंबर जाधव यांच्या पुढाकाराने आणि कामगार आयुक्त कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान संपन्न झाले. यावेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सघंटन सरचिटणीस प्रा मोहन वनखंडे यांनी हा उपक्रम महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री. तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ सुरेश खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राबविण्यात येणार आहे असल्याचे सांगितले.

यावेळी इडियन आर्मी मध्ये कॅप्टन या पदी निवड झाल्याबद्दल डॉ.ओमकार गुरव सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास नगरसेविका सौ. शांताताई जाधव ,नगरसेवक पांडुरंग कोरे, गणेश माळी, प्रकाश ढंग, संदीप सरगर, मोहन वाटवे यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.