पुणे, दि.6 मार्च 2023(महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) भारतीय डाक विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंटस बँकेमार्फत बजाज अलीयांज चा कॅशलेस अपघात विमा पॉलिसी चा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पुणेचे जिल्हा संपर्क प्रमुख शरदराव रासकर यांनी केले. आलेगाव पागा ता.शिरूर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रशासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या या योजने अंतर्गत लाभार्थीना आपघाती विमा दहा लाख रुपये, कायमस्वरूपी अपंगत्व दहा लाख रुपये, कायमस्वरूपी अंशत अपंगत्व दहा लाख रुपये , अपघातामुळे अंतर्गत रुग्ण दवाखाना खर्च कॅशलेस साठ हजार रुपये फक्त हॉस्पिटल, अपघातामुळे बाह्य रुग्ण दवाखाना खर्च कॅशलेस तीस हजार रुपये फक्त हॉस्पिटल, दवाखान्यात ऍडमिट असेपर्यंत दररोज मुलांचा शिक्षण खर्च एक हजार रुपये दहा दिवसांपर्यंत, मुलांचा खर्च एक लाख रुपये जास्तीत जास्त दोन मुलांसाठी एक प्रति वर्ष, कुटुंबाला दवाखाना प्रवास पंचवीस हजार रुपये, अंत्यसंस्कारासाठी लागणारा खर्च पाच हजार रुपये असा लाभ मिळणार आहे. यासाठी वयोमर्यादा 18 ते 64 वर्षे असून 396 रुपयात या वार्षिक पॉलिसीचा लाभ घेता येणार आहे. आता पर्यंत या मोहिमेअंतर्गत 400 नागरिकांचा विमा पॉलिसी करण्यात आली आहे. यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत अनिवार्य आहे या सर्व विमा पॉलिसी जनजागृती मोहीम आलेगाव पागा येथे शरदराव रासकर यांच्या संपर्क कार्यालया मार्फत संपूर्ण पुणे जिल्ह्यातील प्रत्येक गावात जाऊन ही मोहीम राबवण्यात येणार आहे तरी सर्व नागरिकांनी या विमा पॉलिसी चा लाभ घ्यावा असे आवाहन रासकर यांनी केले आहे. यावेळी जीवन थोरात, सुनीता जीवन थोरात यांची विमा पॉलिसी आज काढून देण्यात आली. या कार्यक्रमास पोस्ट मास्तर वैभव आखाडे, किशोर अवचिते, रामदास गुंजाळ, पार्वती गुंजाळ, राजाभाऊ लवांडे, ह भ प नवनाथ भोसले व इतर मान्यवर उपस्थित होते.
