मणेराजुरी, दि.27 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – विष्णू जमदाडे) मणेराजूरी ता. तासगाव येथे रविवारी रात्री ‘ आयशर टेम्पोंचा ‘ बर्निंग थराराने ग्रामस्थांच्या काळजाचा ठोका चुकला ;प्रसंगावधाने ‘ टेम्पों ड्रायव्हरचा प्राण वाचला !परंतु आयशर टेम्पो द्राक्षाच्या क्रेटसहीत जळून खाक झाला . यामध्ये सुमारे पंधरा ते वीस लाखाचे नुकसान झाले. याबाबतची घटना अशी की मणेराजूरीतील भवानी रोडवर अनिल चव्हाण यांच्या घरात पश्चिम बंगाल येथील ‘झेंडू ‘ नामक द्राक्ष व्यापारी रहातो ;त्याचेकडे दररोज द्राक्ष गाडयांची आवक जावक होत असते . रविवारी रात्री दहाच्या दरम्यान पश्चिम बंगालला द्राक्षे पोहचवून आयशर टेम्पो येवून थांबला होता ;यामध्ये ड्रायव्हर झोपी गेला होता रात्री अकराच्या दरम्यान या टेम्पोला अचानक आग लागली ; याठिकाणी वस्ती भागही मोठा असून सर्वजण झोपेत होते ;अचानक लागलेल्या आगीमुळे कोणालाच काही समजेना ;या टेम्पोत द्राक्षाचे मोकळे क्रेट होते प्रथम:त हौद्यात असणाऱ्या या क्रेटला आग लागली हा-हा म्हणता ही आगीचे लोट आकाशात दिसत होते ;ज्या लिंबाच्या झाडाखाली हा टेम्पो लावला होता ते झाड ही जळाले ;या टेम्पोच्या जवळ मोटारसायकली ;व घरे आहेत अचानक आगीच्या घटनेने सर्वाची पळापळ झाली ;केबिनमध्ये झोपलेल्या ड्रायव्हरला हाका मारण्याचा प्रयत्न केला ;झोपेत असणाऱ्या ड्रायव्हरला हाका ऐकू आल्या नाहीत शेवटी प्रसंगवधान राखून समोरची काच फोडून ;किरण जमदाडे ;संजय पाटील ;राहूल जमदाडे ;सतीश जमदाडे ;किशोर जमदाडे ;व दलालाकडील आदी युवकांनी त्याला बाहेर काढले .व पाण्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला ‘ यामुळे आग आटोक्यात आली ;सुमारे शंभर ते दीडशे लिटरच्या डिझेलच्या टाकीजवळ आगीच्या ज्वाला जात होत्या त्यामुळे जवळ जाण्याचे धाडस होत नव्हते ;या टाकीचा स्फोट झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता . त्यामुळे ग्रामस्थांच्या काळजाचा ठोका चुकला होता. तासगाव नगरपालिकेच्या अग्निशामकला 240125 या नंबरवर फोन केला परंतु तो कोणीही उचलत नव्हते शेवटी पोलीस पाटील दिपक तेली यांनी तासगाव पोलीसांना पाचारण केले व त्यांचे मार्फत अग्निशामकची गाडी बोलावून आग आटोक्यात आणली .तासगाव पोलीसांचे बजरंग थोरात व त्यांच्या सहका-यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी करुन पंचनामा केला .
