शिराळा, दि.27 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – नथुराम कुंभार) देशींग हिरोली येथील कवयत्री सौ. मनीषा पाटील हरोलीकर यांच्या”नाती वांझ होताना ” कवितासंग्रहास साहित्य क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘ पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार ‘ नुकताच जाहीर झाला .पुरस्काराची घोषणा प्रतिष्ठानचे पुरुषोत्तम सदाफुले पाटील यांनी केली आहे.1 मे या आंतरराष्ट्रीय कामगार व महाराष्ट्र दिनाच्या दिवशी नेरळ येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.तसेच नारायण सुर्वे यांच्या घरी हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल,असे कळवले आहे. मनीषा पाटील हरोलीकर यांच्या बहुचर्चित ‘नाती वांझ होताना’ या कवितासंग्रहास याअगोदर राजगुरुनगर येथील पद्मश्री नामदेव ढसाळ साहित्य पुरस्कार ,नाशिक येथील साहित्यकणा पुरस्कार ,फलटण येथील धर्मवीर संभाजी पुरस्कार आणि कणेगाव येथील कै.विकास पाटील साहित्य पुरस्कार असे चार पुरस्कार मिळाले आहेत.अनेक समीक्षकांनी या संग्रहाचे कौतुक केले आहे.हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वच स्तरातून या संग्रहाचे स्वागत होत आहे.
