मनोहर भिडेंना तात्काळ अटक करा – सावता परिषदेची मागणी

राज्यभर आंदोलन छेडणार, निषेध मोर्च्याचे आयोजन

इंदापूर, मंगळवार दि.1ऑगस्ट 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) विकृत प्रवृत्तीच्या मनोहर भिडे यास तात्काळ अटक करा अशी मागणी सावता परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. महापुरुषांच्या बाबतीत बदनामी करणारे बेताल वक्तव्य करून समाजात दुही माजविनाचा प्रयत्न करणाऱ्या भिडेंचा परिषदेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात येते आहे. लवकरच संपूर्ण महाराष्ट्र राज्यात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. विकृत प्रवृत्तीच्या मनोहर भिडे यांच्यावर कारवाई करण्यासाठी परिषदेच्या वतीने राज्यभरातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती राज्य संघटक संतोष राजगुरू यांनी दिली. ते म्हणाले भिडे यांनी राष्ट्रपिता शिक्षण महर्षी महात्मा फुले, राष्ट्रपिता महात्मा गांधी, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू, थोर समाजसुधारक राजाराम मोहन राय यांच्या बद्दल बेताल वक्तव्य करून समाज बांधवांच्या भावना प्रचंड दुखावलेल्या आहेत. त्यामुळे मनोहर भिडे यांच्या बद्दल समाजामध्ये प्रचंड चीड निर्माण झालेले आहे. या वक्तव्याचा सावता परिषदेच्या वतीने आम्ही जाहीर जाहीर निषेध करून मनोहर भिडे ला तात्काळ अटक करा तसेच इथून पुढे होणाऱ्या सर्व कार्यक्रमावरती बंदी घाला. त्यांच्यावर कायदेशीर मार्गाने कठोरात कठोर कारवाई करावी. अन्यथा सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करून लढा उभारला जाईल. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, इंदापूर नगरपरिषदेचे नगरसेवक विरोधी पक्ष नेते पोपट शिंदे, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक विजयराव हेगडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते संदीप भोंग, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष छाया पडसलकर, ऍड.रेश्मा गारडे, ऍड.नितीन राजगुरू, काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेल इंदापूर तालुका अध्यक्ष बापू बोराटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब व्यवहारे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल ननवरे, तालुका संघटक सुहास बोराटे, तालुका सोशल मीडिया प्रमुख सचिन शिंदे, सावता परिषदेचे युवा इंदापूर तालुका अजय गवळी, विकास सोसायटीचे माजी संचालक विजय महाजन, संचालक महादेव शेंडे, धनंजय राऊत, हर्षल व्यवहारे, ह.भ.प. राघू व्यवहारे, रामदास बनसोडे, दादा गारडे, दादासाहेब भिसे यांच्या सह इतर पदाधिकारी, सावता परिषचे कार्यकर्ते उपस्थित होते उपस्थित होते.