महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबीर संपन्न

तासगाव, मंगळवार दि. 28 नोव्हेंबर 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) थोर समाज सुधारक महात्मा जोतिराव फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त तासगाव येथील जिव्हाळा सोशल फौंडेशन व शिवशक्ती ग्रुप खानापुरे मळा यांच्या संयुक्त विद्यमाने गोटेवाडी रोड येथील वरद मंगल कार्यालयात रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न झाले. यावेळी नगरसेवक अभिजित माळी, रामभाऊ खानापुरे, संजय मिरजकर, दत्तात्रय सपकाळ, किरण खानापुरे, जयदीप माळी, बसवराज कामगोंडा, संजय माळी, प्रविण माळी, कुमार माळी, अतुल माळी, अक्षय ब्लॅडबँक मिरज यांचे डॉ. प्रांजली देशमुख, प्रकाश कन्नरे, मनाली वांडरे, श्वेता वायदंडे, सतीश साबळे यांच्या सह समाजातील इतर मान्यवर उपस्थित होते.