महापुरुषांचे विचार आचरणात आणावेत – आमदार सुमन ताई पाटील

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात

तासगाव, दि. १४ एप्रिल २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) सर्व समाजघटकांना एकत्रित आणून महापुरुषांचे विचार आचरणात आणावेत असे प्रतिपादन आ. सुमनताई पाटील यांनी केले. सावळज ता. तासगाव येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या यावेळी अध्यक्ष स्थानी पोलीस विभागीय अधिकारी अश्विनी शेंडगे होत्या. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना सविंधान मुळेच एकात्मता टिकून आहे व भविष्यात एकत्रित सर्व समाज मिळून वाटचाल करू अशी भावना व्यक्त केली. यावेळी माजी जि. प. सदस्य किशोर उनउने, इमाम रिहान सहाब, सागर पाटील, ताजुद्दिन तांबोळी, राजू सावंत, अनिल थोरात, दिपक उनउने, शिंदे सर, सदाशिव धेंडे, मिलिंद धेंडे, संजय थोरात यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन केराम, शिदगोंड बापू पाटील, प्रकाश पाटील, ग्रामपंचायत सदस्य विनोद कोळी, अर्चना धेंडे, शोभा सुतार, राजेश गायकवाड, राहुल कलाल, विश्वास निकम, राजू कलाल, यासह मुस्लिम समाजातील सर्व मान्यवर, अण्णाभाऊ साठे तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते, उमाजी नाईक मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. आयोजन तासगाव तालुका आर पी आय अध्यक्ष प्रवीण धेंडे, समस्त बौध्द समाज विश्र्वशांती बोद्ध विहार अध्यक्ष महावीर धेंडे व जयंती कमिटी अध्यक्ष साहिल भिसे, यांनी केले. आभार अमित देवकुळे यांनी मानले.