महाराष्ट्राला आर्थिक ; सामाजिक औद्योगिक नवसंजीवनी देणारा अर्थसंकल्प – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई, दि. ९ मार्च २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा) – महाराष्ट्राला आर्थिक; सामाजिक  अद्योगिक आणि कृषी क्षेत्राला नवसंजीवनी देणारा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला असून या अर्थसंकल्पाचे आम्ही स्वागत करीत असल्याची प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार कडून जनतेला असलेल्या अपेक्षेप्रमाणे सुखद आणि समाधानकारक अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी दृढसंकल्प करणाऱ्या या अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीस यांच्या अर्थशस्त्राचा अभ्यास आणि दूरदृष्टीचे चमक दखविणार यंदाचा अर्थसंकल्प आहे. आदिवासी पाडे वस्तीसाठी 4 हजार कोटी; सामाजिक न्याय विभागाला 16 हजार 494 कोटी ; इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागाला 3 हजार 996 कोटी ; दिव्यांग विभागाला 1 हजार 5416 कोटी;  आदिवासी विकास विभागाला 12 हजार 655 कोटी अशी भरीव तरतूद सामाजिक न्यायाचाविचार करून करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मध्ये वाढ केल्याने आता  5 वी ते 7 पर्यंत  5 हजार रुपये शिष्यवृत्ती आणि 8 वी ते 10 वी 7 हजार 500 रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. तसेच 8 वी पर्यंत च्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार आहे. 500 ग्रामपंचायती आणि 200 महापालिका शाळांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण  योजना राबविण्यात येणार आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त केवळ शंभर रुपयांत शिधा देण्यात येणार आहे.इंदूमिल स्थळी उभारण्यात येणाऱ्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक कामासाठी 741 कोटी रुपये तरतूद करण्यात आली असून त्यापैकी 349 कोटी अदा करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना केवळ 1 रुपया भरून पीक विमा घेता येणार आहे.  नमो शेतकरी योजनेतून शेतकऱ्यांसाठी 6 हजार कोटी 900 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. असंघटित क्षेत्रातील  3 कोटीहून अधिक कामगारांसाठी  असंघटित कामगार कल्याण मंडळ स्थापन करणार तसेच रिक्षा टॅक्सी चालक मालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करणार तसेच  संत गोरोबाकाका महाराष्ट्र माती कला मंडळ स्थापन करण्याची स्वागतार्ह  घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पात केली असल्याचे ना.रामदास आठवले म्हणाले. महिलांना  सक्षम करणारा; उद्योग आणि कृषी क्षेत्राला उभारी देणारा ; सामाजिक न्यायाला प्राधान्य देणारा ; महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा  यंदाचा अर्थसंकल्प आहे. शेतकरी ;कामगार तसेच दलित आदिवासी ओबीसी आणि  महिला यांसह समाजातील सर्व घटकांना सक्षम करणारा ; समान न्याय देणारा आणि  स्वातंत्र्याच्या अमृतकाळात सर्व समाज घटकांना समतेची नवसंजीवनी देणारा अर्थसंकल्प महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला आहे असे मत ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केले.