तासगाव, दि.१५ मार्च २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) एनसीसी डायरेक्टरेट, महाराष्ट्रचे ॲडिशनल डायरेक्टर जनरल, मेजर जनरल वाय.पी.खंडूडी यांचेकडून पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय, तासगावचे प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे, एनसीसी विभागप्रमुख व एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट डॉ.विनोदकुमार कुंभार तसेच २६ जानेवारी २०२३ रोजीच्या आरडीसी परेड नवी दिल्ली साठी जाऊन आलेले सिनिअर अंडर ऑफिसर आसिफ मुजावर आणि ज्युनिअर अंडर ऑफिसर कु. सानिया पाटील यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानपत्र दिले. महाविद्यालयातील एनसीसी विभागाच्या वतीने आरडीसी परेड नवी दिल्ली येथे दरवर्षी एनसीसी छात्र निवडले जातात. यावर्षीच्या परेड साठी महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यापैकी आसिफ मुजावर या विद्यार्थ्याने एनसीसी प्राईम मिनिस्टर रॅलीमध्ये परेड कमांडर म्हणून नेतृत्व केले. दिल्लीतील संचालनात तासगावचे नाव उंचावले व बेस्ट परेड कमांडर पुरस्कार प्राप्त केला. तसेच विद्यार्थिनींमध्ये महाविद्यालयातील आरडीसी परेड साठी जाणारी पहिली विद्यार्थीनी म्हणून कु.सानिया पाटील यांनी नेत्रदीपक कार्य केले. यावर्षी महाराष्ट्र डायरेक्टरेटला एनसीसी प्राईम मिनिस्टर बॅनर मिळाला. यामध्ये आसिफ मुजावर व सानिया पाटील यांचेही योगदान महत्वपूर्ण होते. म्हणून महाराष्ट्र एनसीसी निदेशालय यांच्याकडून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे व एनसीसी ऑफिसर डॉ.विनोदकुमार कुंभार एनसीसी विभाग यांचे अभिनंदन केले. महाविद्यालयातील एनसीसी विभाग व सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांनी हा कौतुक सोहळा आयोजित करून प्राचार्य व एनसीसी छात्र यांचे कौतुक केले. या एनसीसी छात्रांना १६ महाराष्ट्र बटालियन एनसीसी चे कमांडिंग ऑफिसर कर्नल एम.डी.नातू,ऍडम ऑफिसर कर्नल कैलास चंद्र, सुभेदार मेजर हणमंत जाधव, सर्व जेसीओ साहेब व एनसीओ यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेफ्टनंट डॉ. विनोदकुमार कुंभार यांनी केले. तर आभार उपप्राचार्य डॉ.शंकर खाडे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आण्णासाहेब बागल यांनी केले, कार्यक्रमाला उपप्राचार्य जे.ए. यादव , नॅक समन्वयक डॉ. अलका इनामदार, अधिक्षक एम.बी.कदम, महाविद्यालयातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख , प्राध्यापक ,प्रशासकीय सेवक वर्ग ,विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
