पी.डी.व्ही.पी. महाविद्यालयाचा ‘वसंत कन्या’ पुरस्कार कु.लक्ष्मी शंकर बोले हिला प्रदान
तासगाव, दि. ९ मार्च २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा) जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास असेल तर आपण निश्चितच यशस्वी होतो. स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी महिलांचा सन्मान करूया असे उद्गार प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे महिला दिनाच्या निमित्ताने महिला सबलीकरण विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना काढले. ते पुढे म्हणाले स्त्रिया शिकल्या आणि त्या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करू लागल्या तरीही समाजात त्यांना सन्मानाचे स्थान नाही. महिलांचा सन्मान एक दिवस करून चालणार नाही तर त्यांचा दररोज सन्मान होण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजेत. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक भगिनींचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयात जागर स्त्रीशक्तीचा आनंद सोहळा आयोजित केला होता. महिलांसाठी विविध खेळाचे आयोजित केले होते. स्त्रियांचे आरोग्य व काळजी या विषयावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन झाले. महिला दिनाच्या औचित्य साधून महाविद्यालयाच्या वतीने यावर्षीपासून ‘वसंत कन्या’ पुरस्कार देण्याचा संकल्प केला. यावर्षीच्या पुरस्काराची मानकरी एन.सी.सी. विभागातील छात्र लक्ष्मी शंकर बोले ही ठरली. तिला मानपत्र व ट्रॉफी देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नॅक समन्वयक व महिला सबलीकरण समिती प्रमुख डॉ.अलका इनामदार यांनी केले तर आभार प्रा.सविता कोळेकर यांनी मानले. मानपत्राचे वाचन प्रा.पल्लवी मिरजकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आण्णासाहेब बागल यांनी केले. कार्यक्रमाला उपप्राचार्य जे.ए.यादव, डॉ.शहाजी पाटील, प्रा.प्रकाश खाडे, प्रा.विजयसिंह जाधव, प्रा.आर.एस.मोटे, प्रा.ए.के. पाटील, डॉ.के.एन.पाटील, प्रा.सुनिल करांडे, प्रा.सुनिता महाडिक, प्रा.सरस्वती अंदेलवार, प्रा.शामल पाटील, प्रा.अनिता मगदूम, प्रा.नेहा मोरे, प्रा. वर्षा जगदाळे, प्रा.एस.एस. सातपुते, प्रा.अनुराधा निंबाळकर, प्रा.आर.के. नलवडे, प्रा.सुनिता कोळपकर, प्रा.पानारी मॅडम, प्रा.कविता कांबळे, प्रा.मीनाक्षी मुसळे, प्रा.एस.बी.पाटील, निर्भया पथकाचे देशमुख व त्यांची टीम यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय सेवक वर्ग, विद्यार्थिनी उपस्थित होते.
