महिलांनी स्वतःची चौकट निर्माण करावी – डॉ.श्रुती जोशी

सौ.माधुरी पाटील यांना संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे आदर्श माता पुरस्कार

तासगाव, दि.९ मार्च २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) स्त्रियांनी नवी आव्हाने स्वीकारून स्वतःची चौकट निर्माण करावी असे उद्गार विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथील नॅक समन्वयक डॉ.श्रुती जोशी यांनी संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय तासगाव येथे महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना काढले. इंटरनेटच्या माध्यमातून जग जवळ आले आहे. स्त्रीने मनातून कणखर झाले पाहिजे व माणूस म्हणून जगण्याचे स्वातंत्र्य तिला मिळावे जगाला जन्म देणाऱ्या महिलेचा सन्मान फक्त एकच दिवस न होता तिला दररोज सन्मानाची वागणूक मिळावी, तिला समान दर्जा दिला जावा असे मत डॉॅ.जोशी यांनी व्यक्त केले. डॉ. बापूजींच्या शिक्षणकार्यात संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांनी मोलाची साथ दिली. त्यांचे जगणे समाजासाठी होते. महिलांनी नाविन्यपूर्ण उपक्रमात सहभागी होऊन स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे असे त्यांनी सांगितले. अध्यक्षस्थानावरून बोलताना आजीव सेवक एच.बी.पाटील यांनी मुलांचा पहिला कुलगुरू स्त्री-माता आहे हे सांगून महिलांचा सन्मान केला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सौ. माधुरी जगन्नाथ पाटील यांना ‘संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे आदर्श माता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी विद्यार्थिनींनी तयार केलेल्या ‘गरुड झेप’ भित्तीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.बी. एम.पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे आदर्श माता पुरस्काराचे स्वरूप व माहिती सांगितली. पाहुण्यांचा परिचय डॉ.ए.एस. चिखलीकर यांनी केला तर मानपत्राचे वाचन डॉ.एल.व्ही.भंडारे यांनी केले आभार कु.कोमल कदम यांनी मानले. सूत्रसंचालन कु.श्वेता पाटील व कु.संध्या कुंभार यांनी केले. यावेळी सौ.प्राजक्ता घोडके, सौ.माधुरी पाटील, प्रा.जे.डी.पाटील यांनी मनोगते व्यक्त केले. कार्यक्रमाला डॉ.एम. एस.उभाळे, प्रा.आनंद पाटील व्याख्याते जयसिंग सावंत, अजित घोडके, राहुल पवार, प्रा.आण्णासाहेब बागल, यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय सेवकवर्ग, प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.