कोल्हापूर, दि.10 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) रोजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी आपणच घ्यावी, कुटुंबाला वेळ देतानाच आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्राच्या विभागीय अध्यक्ष डॉ.वसुधा कर्णे यांनी केले. वीरशैव लिंगायत माळी समाज महिला मंडळ, कोल्हापूर व सावित्री शक्तीपीठ, कोल्हापूर यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी शक्तीपीठाच्या सरव्यवस्थापक सुवर्णा कोरे होत्या. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजातील महिलांचा ‘सावित्रीच्या लेकी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये शितल माळी, पुष्पा माळी, शुभांगी माळी, वनिता माळी, मानसी माळी, भारती माळी, कविता माळी, सुवर्णा माळी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सौ. साधना माळी यांची वीरशैव लिंगायत माळी समाज महिला मंडळ, कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी तर सौ. मीनाक्षी माळी यांची सावित्री शक्तीपीठ, कोल्हापूर च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी हेमलता माळी व सुवर्णा कोरे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास वंदना माळी, विद्या माळी, छाया माळी, अंकिता माळी, इंद्रायणी चौगुले, भारती माळी, रूपाली माळी यांच्यासह सर्व संचालिका उपस्थित होत्या. स्वागत साधना माळी यांनी, प्रास्ताविक मीनाक्षी माळी यांनी, सूत्रसंचालन अर्चना माळी व निर्मला माळी यांनी केले तर आभार वैशाली माळी यांनी मानले. प्रारंभी संघटनेच्या अध्यक्षा यांनी केले.
