माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला शैक्षणिक साहित्य वाटप

तासगाव, दि.११ फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील कौलगे येथील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेचे माजी विद्यार्थी ॲड. विक्रम पाटील यांनी एस.एस.सी. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य याचे वाटप केले. ॲड. विक्रम पाटील हे सध्या पुणे, शिवाजीनगर येथील न्यायालयात कार्यरत आहेत. ॲड. विक्रम पाटील यांनी एस. एस. सी. मधील विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ॲड. विक्रम पाटील हे मूळचे लोढे गावचे रहिवासी असून त्यांना शाळेबद्दल कायम आत्मीयता असते. यावेळी कौलगे सरपंच रणजित माने , लोढे गावचे उपसरपंच सुहास कांबळे, ॲड. राहुल पडवळ, ॲड. किरण पाटील, ॲड. गणेश वाघोले, संतोष पाटील, बाळासो पाटील, मुख्याध्यापक एस.बी.शिंदे यांच्या बरोबर शाळेतील विद्यार्थी , शिक्षक उपस्थित होते.