मोहन माने लिखित ‘झंझावात’ नाटक व अब्दुल सय्यद लिखित ‘आयुष्याच्या वाटेवर’ कविता संग्रहाचे प्रकाशन

तासगाव, दि.28 फेब्रुवारी 2023 (प्रतिनिधी – महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) जेष्ठ साहित्यिक मोहन माने यांचे झंझावात नाटक व अब्दुल सय्यद यांचा आयुष्याच्या वाटेवर कविता संग्रह या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक मुबारक उमराणी यांच्या हस्ते झाले. श्री ज्ञानदा साहित्य, कला व सांस्कृतिक मंडळ सावर्डे व ग्रामपंचायत सावर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने सावर्डे ग्रामपंचायत येथे हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी सरपंच उल्काताई माळी होत्या.
यावेळी माजी सरपंच मारुती दादा, माजी आदर्श सरपंच प्रदीप काका पाटील, उपरपंच संजय काका माने पाटील, हरिभाऊ गुरव, बाळासाहेब शेटे, पांडुरंग लांडगे, प्रकाश भोसले, प्रकाशक तानाजीराजे जाधव व विद्या जाधव, राजाराम माने, प्रा. भास्कर कदम, राम गुरूजी, जेष्ठ साहित्यिक शिवाजीराव देशमुख यांच्या सह साहित्यिक व नागरिक उपस्थित होते.