पलूस, दिनांक 19 सप्टेंबर 2024 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) नागठाणे ता.पलूस येथील यशवंत राजाराम साळुंखे -पाटील वय वर्षे ७२ यांचे बुधवार दि.18 सप्टेंबर रोजी निधन झाले. अनिल यशवंत साळुंखे -पाटील यांचे ते वडील तर महाराष्ट्र मराठी न्यूज चे उपसंपादक आबासाहेब चव्हाण यांचे ते सासरे होत. त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा सुन नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन शुक्रवार दि. 20 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9 वाजता नागठाणे येथे आहे.
