यशस्वी पत्रकारीतेसाठी कायद्याचे ज्ञान आवश्यक : डॉ.शिवाजीराव जाधव

सांगलीत डिजिटल मिडिया परिषदेची कार्यशाळा संपन्न

सांगली, दि. 3 सप्टेंबर 2024 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक दोन्ही माध्यमातून पत्रकारांना कायद्याचे ज्ञान आवश्यक आहे तरच त्यांची पत्रकारिता यशस्वी होईल, असे मत शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो.जाधव पत्रकारिता अध्यासनाचे समन्वयक प्रा.डॉ.शिवाजी जाधव यांनी व्यक्त केले. मराठी पत्रकार परिषदेच्या सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि सांगली जिल्हा डिजिटल मीडिया परिषद यांच्या वतीने आयोजित डिजिटल मीडिया आणि कायदे या विषयावरील कार्यशाळेत प्रा.जाधव बोलत होते. कार्यशाळेला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुमारे दोनशेहून अधिक पत्रकारांनी कार्यशाळेत सहभाग घेतला. दैनिक लोकमतचे वृत्तसंपादक हनुमंत पाटील यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे, कार्याध्यक्ष संतोष शिंदे, मार्गदर्शक ॲड. महादेव बन्ने यावेळी उपस्थित होते. कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांच्या हस्ते कार्यशाळेतील सहभागी पत्रकारांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. कार्यशाळेत युट्यूब, वेब पोर्टल आणि विविध माध्यमांतून सक्रिय असलेल्या पत्रकारांना वृत्तलेखन, बातम्यांचा दर्जा, शोध पत्रकारिता, स्थानिक पातळीवरील विविध विषयांची निवड कशी करावी, कायदेशीर बाबी लक्षात घेऊन विषयांची मांडणी करणे अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. पत्रकारांच्या शंकांचे निरसन डॉ. शिवाजीराव जाधव आणि मार्गदर्शक ॲड. महादेव बन्ने यांनी दृकश्राव्य माध्यमातून कार्यशाळेत मार्गदर्शन केले. राज्य कार्यकारिणी सदस्य तानाजीराव जाधव यांनी स्वागत केले. मराठी पत्रकार परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज काटकर यांनी प्रास्ताविक केले. डिजिटल मिडिया परिषदेचे नवनियुक्त सांगली जिल्हा अध्यक्ष कुलदीप देवकुळे यांनी आभार मानले. जिल्हा कार्याध्यक्ष मोहन राजमाने यांनी सुत्र संचालन केले. नवनियुक्त सांगली जिल्हा ग्रामीण अध्यक्ष संजय माळी, कार्याध्यक्ष अभिजीत शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष संदीप नाझरे, मोहसीन मुजावर, आक्रम शेख, जिल्हा सरचिटणीस प्रकाश सुर्यवंशी, जिल्हा चिटणीस धीरज प्रक्षाळ, नासीर सय्यद, जिल्हा सरचिटणीस रमेश सरडे, गणेश माने, सल्लागार ॲड. अनिरुद्ध पाटील, चंद्रकांत क्षिरसागर, जिल्हा कोषाध्यक्ष मिलिंद पोळ यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पत्रकार पदाधिकारी यांनी कार्यशाळा यशस्वी केली.