येळावीत शिवजयंती निमित्त रक्तदान शिबीरास उस्फूर्त प्रतिसाद

तासगाव, दि.२० फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) येळावी ता.तासगांव येथे 19 फ्रेबुवारी रोजी शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास युवक वर्गाने चांगला प्रतिसाद मिळाला. त्यावेळी शिबिरात 111 बॉटल रक्तसंकलन झाले. शिबिराचे आयोजन शुभम पाटील यांनी केले. यातून ते गरजू लोकांना मोफत रक्तपुरवठा करून देऊन सहकार्य करत असतात. ते संत निरंकारी मिशन च्या माध्यमातून नवयुवकांना दरवेळी मानवतेच्या कार्यात समाविष्ट करून घेत असतात. रक्तसंकलन आदर्श ब्लड बँक सांगली यांनी केले त्यावेळी संजय टकले उपस्थित होते. या उपक्रमास परिसरा मध्ये शुभम पाटील आणि त्यांच्या सहकारी मित्र परिवारास सहकार्य मिळाले.