राजाराम कारखाना निवडणूकीत सत्तारूढ आणि विरोधी पॅनेल जाहीर

सत्तारूढ आणि विरोधी आघाडीच्या उमेदवारांची नावे जाहीर, प्रचाराला वेग, सत्ताधारी आघाडीत माजी आमदार महादेवराव महाडिक-अमल महाडिक

कोल्हापूर, दि. १४ एप्रिल २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा) राजाराम कारखाना निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी कारखाना कार्यस्थळावर सत्तारूढ छत्रपती राजर्षी शाहू सहकार आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक, अमल महाडिक, खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. त्यामुळे आता निवडणूकीत रंगत आली आहे. उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे, उत्पादक गट क्रमांक १ – विजय वसंत भोसले, संजय बाळगोंडा मगदूम, उत्पादक गट क्रमांक २ – शिवाजी रामा पाटील, सर्जेराव बाबुराव भंडारे, अमल महादेवराव महाडिक, उत्पादक गट क्रमांक ३ – विलास यशवंत जाधव, डॉ.मारुती भाऊसो किडगावकर, सर्जेराव कृष्णात पाटील (बोणे), उत्पादक गट क्रमांक ४ – तानाजी कृष्णात पाटील, दिलीपराव भगवान पाटील, मीनाक्षी भास्कर पाटील, उत्पादक गट क्रमांक ५ – दिलीप यशवंत उलपे, नारायण बाळकृष्ण चव्हाण, उत्पादक गट क्रमांक ६ – गोविंद दादू चौगले, विश्वास सदाशिव बिडकर, महिला राखीव गट – कल्पना भगवानराव पाटील, वैष्णवी राजेश नाईक, इतर मागास प्रतिनिधी गट – संतोष बाबुराव पाटील, अनुसूचित जाती जमाती गट – नंदकुमार बाबुराव भोपळे, भटक्या विमुक्त जाती जमाती गट – सुरेश देवाप्पा तानगे, संस्था गट – महादेवराव रामचंद्र महाडिक. आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी उमेदवारांची नावे घोषित करताच उपस्थित समर्थकांनी जल्लोष केला. यावेळी बोलताना माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. गेली अठ्ठावीस वर्षे कारखाना ज्या विश्वासाने सभासदांनी आमच्या हाती सोपवला, त्याच विश्वासाने यंदाही कारखान्याचे सुज्ञ सभासद आम्हाला सेवेची संधी देतील. विरोधकांनी कितीही प्रयत्न केला तरी राजाराम कारखाना त्यांना बळकावता येणार नाही. असे उद्गार महाडिक यांनी काढले. सत्तारूढ सहकार आघाडीचे नेते अमल महाडिक यांनी बोलताना सर्वसमावेशक उमेदवारांचे तगडे पॅनेल आम्ही जाहीर केले असून, विजयाच्या दिशेने आम्ही पहिले पाऊल टाकल्याचे सांगितले. सर्वसामान्य शेतकरी सभासद आमच्या पॅनेलला भरघोस मतांनी विजयी करतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. खासदार धनंजय महाडिक यांनी माघार घेतलेल्या उमेदवारांचे आभार मानले तसेच सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. विरोधी आघाडीची ही घोषणा करण्यात आली. छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीने उमेदवारांची घोषणा केली आहे. आमदार पाटील यांनी परिर्वतन आघाडीच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये व्यक्ती उत्पादक सभासद गट क्रमांक एकमध्ये शालन बाबुराव बेनाडे रुई, किरण बाबासो भोसले रुकडी तर व्यक्ती उत्पादक सभासद गट क्रमांक दोनमध्ये शिवाजी ज्ञानू किबिले कुंभोज, अभिजीत सर्जेराव माने भेंडवडे, दिलीप गणपतराव पाटील टोप यांची उमेदवारी आहे. सभासद गट क्रमांक तीनमधून विलास शंकर पाटील भुये, विठठल हिंदुराव माने वडणगे, बळवंत रामचंद्र गायकवाड आळवे तर सभासद गट क्रमांक चारमध्ये दिनकर भिवा पाटील वाशी, सुरेश भिवा पाटील वाशी, संभ्घजी शंकरराव पाटील वाशी तर गट क्रमांक पाचमध्ये विजयमाला विश्वास नेजदार कसबाबावडा, मोहन रामचंद्र सालपे कसबा बावडा यांना उमेदवारी आहे. व्यक्ती सभासद गट क्रमांक सहामधून दगडू मारुती चौगले धामोड, शांताराम पांडूरंग पाटील सावर्धन हे उमेदवार आहेत. महिला गटात पुतळाबाई मारुती मगदूम कांडगाव, निर्मला जयवंत पाटील निगवे दुमाला यांना उमेदवारी आहे. अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी गटात बाबासो थळोजी देशमुख शिरोली पुलाची तर इतर मागास प्रतिनिधी गटात मानसिंग दत्तू खोत नरंदे तर भटक्या विमुक्त जमाती प्रवर्ग गटात आण्णा विठ्ठू रामाण्णा वसगडे हे उमेदवार आहेत. संस्था प्रतिनिधी गटात वसगडे येथील सचिन नरसगोंडा पाटील हे निवडणूक लढवित आहेत.