राष्ट्रीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत लक्ष्य स्कूलचे घवघवीत यश

तासगाव, सोमवार दि.26 सप्टेंबर 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) हैद्राबाद येथे झालेल्या राष्ट्रीय थाय-बॉक्सिंग स्पर्धेत सांगली जिल्हयाचे नेतृत्व करत श्री लक्ष्य निवासी सैनिक पॅटर्न स्कूल मणेराजुरीच्या खेळाडूंनी 2 गोल्ड, 1सिल्व्हर तसेच 1 ब्राँझ पदक अशी एकुण 4 पदके मिळवत यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थी – आर्यन मोठे – गोल्ड मेडल साईनाथ इंगोले- गोल्ड मेडल सीकर गायकवाड – सिल्व्हर मेडल इशान माळी – ब्राँझ मेडल सर्व यशस्वी विदयार्थ्यांचा सत्कार श्री लक्ष्य स्कूलचे संस्थापक अध्यक्ष विशाल माळी सर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी स्कुल सचिव व मुख्याध्यापक रुपाली लांडगे मॅडम, उपमुख्याध्यापक विश्वनाथ गुरु सर इनचार्ज विजय माळी सर प्रशिक्षक सौरभ पाटील सर सर्व शिक्षक विदयार्थी उपस्थित होते.