मणेराजूरी, दि.15 फेब्रुवारी 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा)
मणेराजुरी ता. तासगाव येथील राहूल सुबराव जमदाडे ( वय -३३ ) यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे उपचार सुरू असताना आकस्मित निधन झाले. त्यांचे निधनाने मणेराजूरीसह पिंपळे गुरव पुणे परिसरात शोककळा पसरली.
आतिशय होतकरू मनमिळावू व युवा उद्योजक म्हणून ते सर्व परिचित होते. ‘स्वराज फौंडेशन ‘ मणेराजूरी या युवकांचे संघटन उभा करण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. गेल्या पंधरा दिवसापासून त्यांचेवर पोटाच्या विकारासाठी आदित्य बिर्ला हॉस्पीटल पुणे येथे उपचार सुरु होते. त्यांचे पश्चात दोन लहान मुले, पत्नी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. रक्षा विसर्जन गुरूवार सकाळी साडेआठ वाजता जमदाडे वस्ती गव्हाण रोड मणेराजूरी येथे होणार आहे.
