लक्ष्य सैनिक पॅटर्न स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

मणेराजुरी, दि. २० फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) मणेराजुरी ता. तासगाव येथील श्री लक्ष्य सैनिक पॅटर्न स्कूल मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी झाली. तसेच गव्हाण मध्ये स्कूलच्या वतीने भव्य मिरवणून काढण्यात आली . गावातील मंडाळाच्या शिवमुर्तींचे पूजन श्री लक्ष्य स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले गावातील सरपंच, उपसरपंच, सोसायटी चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ नागरिक, संस्थेचे अध्यक्ष विशाल माळी, सचिव रूपाली लांडगे उपस्थित होते. या वेळी श्रेयश फाकडे, सार्थक घोरपडे, पार्श्वनाथ कवठेकर, सोहम कोरे, सुमित किर्दत, यश घुटुगडे, आर्यन पवार, आदित्य शिंदे, प्रणव राजमाने, मयूर किर्दत, हरकेश कोरे, अमोल फाळके, सुजल जाधव, सौरभ जाधव या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. आकाश लांडगे व समर्थ एडके यांनी पोवाडा सादर केला. तेजस माळी व श्रेयश माळी यांनी शिववंदना सादर केली.