तासगाव, दि. २७ फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) वि. वा. शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो त्या निमित्ताने येथील पदम भूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांच्या हस्ते कवी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन केले. मराठी भाषेची थोरवी सांगून मराठी गौरव करण्यात आला. यावेळी स्वामी रामानंद भारती विद्यामंदिरचे प्राचार्य व्ही.एच.पाटील, उपप्राचार्य जे.ए.यादव, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. अमोल सोनवले, मराठी विभाग प्रमुख डॉ.शहाजी पाटील, इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. प्रकाश खाडे, ज्युनिअर विभाग प्रमुख प्रा. एस. डी. पाटील, प्रा. आण्णासाहेब बागल, प्रा. ए. आर. पाटील, डॉ. एन. एच. गायकवाड, प्रा. सुनिल करांडे, प्रा. रणजीत कुंभार, प्रा. जी. आर. पाटील, प्रा. वर्षा जगदाळे, दिलीप सुवासे, प्रकाश बुकशेठ यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते.
