वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात अनोखे रक्षाबंधन

वृक्षांना आणि पुस्तकांना राखी बांधून केले रक्षाबंधन, ‘एक राखी पुस्तकासाठी, एक राखी वृक्षासाठी’

तासगाव (प्रतिनिधी) बहिण भावातील अतूट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. हे रक्षाबंधन पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने साजरे केले. ‘एक राखी पुस्तकासाठी ,एक राखी वृक्षासाठी’ हा अनोखा उपक्रम साजरा केला. विद्यार्थिनींनी महाविद्यालय परिसरातील वृक्षांना राख्या बांधल्या तसेच ग्रंथालयातील पुस्तकांना राख्या बांधून अनोखे रक्षाबंधन साजरे केले. यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे म्हणाले वृक्ष आपल्याला ऑक्सिजन देतात. पुस्तके आपल्याला ज्ञान देतात आणि त्यांचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे.आज आपण त्यांचे रक्षण केले तर भविष्यात ते आपले रक्षण करण्यासाठी उभे राहतील. विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची आवड जोपासावी. आपली प्रगल्भता वाढवण्यासाठी महिन्यातून किमान एक पुस्तक आपण वाचलेच पाहिजे. विद्यार्थिनींनी रक्षाबंधनाची अनोखी परंपरा महाविद्यालयात सुरू केली त्याबद्दल त्यांचे कौतुक केले.यावेळी विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाची पाहणी केली विविध संदर्भ ग्रंथ, पुस्तके, मासिके यांची माहिती जाणून घेतली. प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.आण्णासाहेब बागल यांनी केले तर आभार ग्रंथपाल प्रा.मिनाक्षी मुसळे यांनी मानले. कार्यक्रमाला विज्ञान विभाग प्रमुख प्रा.के.एस.गायकवाड, सहाय्यक ग्रंथपाल प्रा.सुनिता महाडिक, प्रा.ए.एस.सुतार, प्रा.आर.डी.पाटील, प्रा.डी.व्ही.पाटील, प्रा.एल. एस.जाधव, प्रा.रणजीत पाटील, प्रा.सुशांत झांबरे, प्रा.एम.एम.सुर्यवंशी, प्रा.पी. आर.पाटील , प्रा.आर.आर. आष्टेकर, प्रा.पी.ए पाटील यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी – विद्यार्थ्यांनी उपस्थित होते.