वाचन माणसाच्या ज्ञानकक्षा समृद्ध करते – प्राचार्या डॉ.त्रिशला कदम

श्रीमती आ.रा.पाटील कन्या महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने वाचन प्रेरणा दिन उत्साहात

इचलकरंजी, दि. 29 ऑक्टॉबर 2023(महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय इचलकरंजी येथे भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण जगभर साजरा करण्यात येणारा वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागामार्फत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. त्रिशला कदम यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. भारतरत्न डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांच्या आयुष्याचा खडतर जीवन प्रवास उलगडला, अतिशय खडतर परिस्थितीमध्ये पुस्तकांच्या साथीने ज्ञानाच्या कक्षा समृद्ध करत यशाला गवसणी घातलेल्या एपीजे अब्दुल कलाम यांची गोष्ट त्यांनी विद्यार्थिनींना सांगितली. वाचन माणसाच्या ज्ञान कक्षा समृद्ध करते त्यामुळे आपण रोज काहीतरी वाचलं पाहिजे, काहीतरी चांगलं ज्ञान घेतलं पाहिजे आणि त्या ज्ञानाचा आपल्या रोजच्या जगण्यात समावेश केला पाहिजे. चांगले वाचन आपला आत्मविश्वास वाढवते, डॉ कलामांचे भारताला ज्ञानसत्ता बनवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी घालून दिलेली मुल्ये आपण जपली पाहिजेत,असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा.मीनाज नायकवडी यांनी केले तर आभार गृह विज्ञान विभाग प्रमुख प्रा.संगीता पाटील यांनी मानले. ग्रंथालय विभागाकडील श्री सातपुते आणि पवन माने यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले, या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक,प्रशासकीय सेवक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.