सांगली, दि. ९ मार्च २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) गेली अनेक वर्ष देशामध्ये व महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येप्रमाणे शासकीय नोकर भरती केली नाही. जनतेला रोजगार उपलब्ध करुन दिला नाही. तसेच महागाईचा डोंगर जनतेच्या डोक्यावर ठेवणे चालूच आहे. त्यामुळे लोकांनी कॉंग्रेसचे सरकार उलथवून टाकले व भाजपाने त्या काळामध्ये मोठ मोठी आश्वासने दिले होते. परंतु भाजपाने देश विकावयास काढला आहे. लोकांना लोकसंख्ये प्रमाणे नोकर भरती नाही. भांडवल शहाना खाजगीकरणाच्या नावाखाली सावकार करुन इथल्या शासकीय नोकऱ्या संपविणेचे काम भाजप सरकार करीत आहे. तसेच विज दरवाढ जिवनावश्यक वस्तुची झालेली दरवाढ, गॅसदर वाढ, पेट्रोल दरवाढ त्यामुळे भारतातील जनता होरपळून निघत आहे. पेट्रोलचे दर १०७ रू. लिटर तर गॅसचा दर ११२० रुपयांना मिळत आहे. आम्ही महागाई कमी करु व गोर गरीब जनतेला न्याय देणेचा प्रयत्न करु असे आश्वासन देवून गोरगरीब जनतेची फसवणूक करुन गोरगरीब भाबड्या मतदारांनी महागाई कमी होईल असे समजुन भारतीय जनता पार्टीला भरघोस मते दिली मात्र गेली १० वर्षे हे सरकार सत्तेवर असुन कॉंग्रेसच्या काळात जेवढी महागाई होती त्या पेक्षा दुप्पट, तिप्पट महागाई भारतीय जनता पार्टीच्या राज्यात झालेली आहे. तरी लवकरात लवकर महागाई नियंत्रणात आणून जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करावेत व सर्वसामान्य माणसाला दिलासा द्यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष (दक्षिण) महावीर कांबळे यांनी केली. यावेळी जिल्हासचिव राजू मुलानी, रहिमभाई कवठेकर, चंद्रकांत खरात, सतिश शिकलगार, अनिल अंकलखोपे, नाझिर झारी, सिद्धार्थ लोंढे, आम्रपाली लोंढे, प्रमोद मल्लाडे, अतिश कांबळे, मिलिंद कांबळे, सागर आठवले, विशाल लोंढे, सूरज वाघमारे, दिपक कांबळे, मानतेश कांबळे, किशोर आढाव, आनंदसागर पुजारी, महेश कुरणे, अमोल साबळे, वहिदा कडलास्कर, यासीन कडलास्कर, चंद्रकांत कोलप,दत्ता आठवले, भाऊसाहेब कोळी, राजू बेग, जमीर जामदार, राहुल धोतरे, धम्मदिप कांबळे, महावीर पाटील, गौतम लोटे, संतोष कांबळे, आकाश जाधव इ. बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

