वाचन संस्कृती समृद्ध करण्यासाठी गावाचा पुढाकार
तासगाव, दि. ३१ जानेवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा)
वाचन संस्कृती समृद्ध करण्यासाठी वासुंबे ता.तासगाव येथील गावकऱ्यांनी एक वेगळा अनोखा उपक्रम राबवला. गावातील युवा कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन जिल्ह्या परिषद मराठी शाळेस इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत च्या मुलांसाठी शालेय पाठ्यपुस्तका सोबत अवांतर वाचन आणि सामान्य ज्ञान वाढविण्यासाठी लोकसहभागातून जवळपास 500 पुस्तके प्रजासत्ताक दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात भेट दिली. हा उपक्रम ग्रामपंचायत सदस्य विकास मस्के यांनी पुढाकार घेऊन राबविला.
आधुनिकतेच्या जगात मुलांच्यावर मोबाईल, टीव्ही चा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे शिक्षण घेणारी मुलं आज शालेय पाठ्यपुस्तक सोडून अवांतर पुस्तक वाचन करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. म्हणून गावात वाचन संस्कृती टिकावी, गावातील शिक्षण घेणारी मुलं एक चांगला आदर्श विद्यार्थी घडावा, आदर्श शाळा व्हावी या साठी गावतील युवकांनी पुढाकार घेऊन समाजातील लोकांच्याकडून निधी संकलित करून पुस्तके भेट दिली. या मध्ये राष्ट्रीय महापुरुष, निबंध, भाषण शैली, कथा-कादंबरी, विविध गोष्टी, विज्ञानाचे प्रयोग, ग्रहांचा अभ्यास, खगोलशास्त्र, आत्मचरित्र आशा विविध घटकातील पुस्तकांचा समावेश आहे.
या उपक्रमाला विलास बोराडे, संजय हिवरे, अनिल चव्हाण, वल्लभदास शेळके, अभिजीत पाटील(तासगाव पोलीस), राजेंद्र मोरे, दत्तात्रय एडके(मुंबई पोलीस), प्रसाद लिगाडे, प्रकाश कोळेकर, महेश गोड-पाटील, प्रवीण लांडगे, संतोष जाधव(आटपाडी पोलीस), शिवाजी वाघमोडे(मुंबई पोलीस), माजी उपसरपंच वनिता पाटील, संजय खराडे, विकास बरगुले, सागर माळी, तेजस सदाकळे (सावर्डे), आशिष पाटील, आशिष काटे या सर्वांच्या विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रम साठी सरपंच जयंत पाटील, उपसरपंच उमेश एडके यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळेचे शिक्षक, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, युवक, कर्मचारी उपस्थित होते.
