वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात ‘अग्रणी महाविद्यालय योजने’ अंतर्गत एक दिवशीय कार्यशाळा
तासगाव, दि.24 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) विद्यार्थ्यांनी सर्जनशील राहुन विद्यार्थी जीवनात विविध कोर्सेस करावेत. संघर्ष आणि कष्ट करून सर्वांगीन विकास करावा असे उद्गार शिवाजी विद्यापीठ अकॅडेमीक कौन्सिल मेंबर डॉ.पी.एन. पाटील यांनी पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे ‘अग्रणी महाविद्यालय योजने’ अंतर्गत आयोजित एक दिवशीय कार्यशाळेत बोलताना काढले. महाविद्यालयात मराठी ,इंग्रजी,भूगोल , अर्थशास्त्र , समाजशास्त्र ,एनसीसी , रसायनशात्र ,आणि वाणिज्य विभागाच्या वतीने एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन केले होते.साधन व्यक्ती म्हणून डॉ.विजय शिंदे , डॉ. रत्नदीप जाधव ,डॉ सचिन हुदळे , डॉ. सौ. एन. एस.गायकवाड, प्रा. विकास मस्के ,सेकंड ऑफिसर योगेश साने , डॉ.संजय अंकुशराव ,डॉ. उदय लोखंड यांनी मार्गदर्शन केले.पाटील पुढे म्हणाले विद्यार्थ्यांनी पात्रता सिद्ध करण्यासाठी आवश्यक कौशल्य आत्मसात करावीत. अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत विद्यार्थ्यांनी विचारांची देवाणघेवाण करून नवनवीन संकल्पना आत्मसात करण्याचे आवाहन केले. अग्रणी महाविद्यालय योजनेचे समन्वयक डॉ. अमोल सोनवले यांनी शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय योजनेचा हेतू आपल्या प्रास्ताविकातून सांगितला. पाहुण्यांचा परिचय इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.प्रकाश खाडे यांनी केला.आभार डॉ.अजय अंभोरे यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आण्णासाहेब बागल यांनी केले.या कार्यशाळेसाठी प्रमुख अग्रणी महाविद्यालय म्हणून आदर्श कॉलेज विटा यांनी महत्त्वाची भूमिका पार पडली.कार्यक्रमाला उपप्राचार्य जे.ए.यादव,डॉ.शंकर खाडे, डॉ.शहाजी पाटील, डॉॅ.अर्जुन वाघ , लेफ्टनंट डॉ.विनोदकुमार कुंभार, डॉ.स्वाती जाधव , डॉ. अमित माळी, प्रा.जी.आर.पाटील यांसह महाविद्यालयातील विविध विभागाचे विभागप्रमुख,प्राध्यापक विद्यार्थी – विद्यार्थिनी, प्रशासकीय सेवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
