विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पहावीत – प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे

पीडीव्हीपी महाविद्यालयात एमएचटी-सीईटी मार्गदर्शन वर्गाचे उद्‌घाटन

तासगाव, दि.20 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) मुलांच्या प्रगतीमध्ये पालकांचा वाटा मोठा असतो विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत असे उद्गार श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सेवक व सांगली जिल्हा विभाग प्रमुख प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय , तासगाव येथे एमएचटी-सीईटी मार्गदर्शन वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना काढले. ते पुढे म्हणाले शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचा विचार घेऊन ग्रामीण भागातील बहुजन विद्यार्थी शिकले पाहिजेत म्हणून महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ पासून एमएचटी-सीईटी व इतर स्पर्धा परीक्षा याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.पारंपरिक शिक्षणाबरोबरच व्यवसायिक अभ्यासक्रमाची माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा फायदा घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. एमएचटी -सीईटी मार्गदर्शन वर्गाचे समन्वयक प्रा.पी.डी.पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात बारावीनंतरच्या संधी व विविध परीक्षांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.आभार प्रा.डी.व्ही.पाटील यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आण्णासाहेब बागल यांनी केले. कार्यक्रमाला विज्ञान विभाग प्रमुख प्रा.के.एस. गायकवाड, प्रा.आर.डी. पाटील, प्रा.एस.एस.सातपुते , प्रा.ए.आर.गणेशवाडे, प्रा.एस.एम.खेराडकर , प्रा.एल.एस.जाधव , प्रा.आर.एस.पाटील, प्रा.एस.एस. झांबरे, प्रा.एम.एम.सुर्यवंशी , प्रा.पी.ए.पाटील यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक , विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.