विम्याची रक्कम एकाच दिवसात वारसदारास सुपूर्द

एलआयसी तासगाव शाखेची तत्परता

तासगाव, दि.17 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) विमा पॉलिसी केलेल्या व्यक्तीच्या मृत्यू नंतर त्यांच्या वारसास त्वरित एकाच दिवसात विम्याची रक्कम सुपूर्द करण्याची तत्परता एलआयसी च्या तासगाव शाखेने दाखवली. याबाबत माहिती अशी की, तासगाव तालुक्यातील येळावी येथील राणी शिवाजी सूर्यवंशी यांनी 30 मे 2017 रोजी एलआयसी तासगाव शाखेकडून “जीवन आनंद” ही एलआयसीची दोनलाख ची पॉलिसी’ घेतली होती. ‘जिंदगी के साथ भी….. और…. जिंदगी के बाद भी’ हे या प्लॅनचे घोषवाक्य आहे. राणी सूर्यवंशी यांनी वार्षिक 11,640 रुपये याप्रमाणे 5 हप्ते एलआयसी कडे जमा केले होते. 6 वा हप्ता ग्रेस पिरियडचा लाभ घेऊन 30 जून 2023 पर्यंत भरावयाचा होता. परंतु दुर्दैवाने त्यांचा 16 जून 2023 रोजी हृदय विकाराच्या धक्याने मृत्यू झाला. तासगाव एलआयसी ने एका दिवसात मूत्यू दावा मंजूर करून त्यांच्या पश्चात कुंटबियाना आधार दिला. “आषाढी एकादशी व बकरी ईद ची- सुट्टी” असतांनाही शाखाधिकारी सौ. स्मृती पाटील, विकास अधिकारी आर. जी. सावंत साहेब, एच.जी.ए. संदीप सुवासे यांनी वारसदार किरण शिवाजी सूर्यवंशी यांच्या घरी जाऊन सांत्वन केले. एकाच दिवसात क्लेम मंजूर करून त्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम जमा केली. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत सांगलीचे जिल्हा अध्यक्ष सर्जेराव सूर्यवंशी उपस्थित होते. याप्रकरणी एल आयसी चे अधिकारी हणमंतराव कोळी, सौ.शलाका सावंत मॅडम, सहाय्यक प्रशासन अधिकारी सौ.मंजुषा ठोंबरे यांचे सहकार्य लाभले.