शालेय तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये श्री लक्ष्य स्कूलचे यश

तासगाव, मंगळवार दि. 10 ऑक्टॉबर 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव येथे झालेल्या शालेय तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्री लक्ष्य अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी दहा पथके मिळवली. सात विद्यार्थ्यांची शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. वेदांत पवार, विश्वजीत शिंदे, संग्राम पाटील, बेदांत कुंभारकर, आर्यन जाधव, सार्थक आढळी, श्रीकर गायकवाड या विद्यार्थ्यांनी 4 × 400 क्रॉस कंट्री, तीहेरी उडी आणि शंभर मीटर धावणे या खेळांमध्ये यश मिळवत शाळेचे नाव उज्वल केले. यशस्वी विदयार्थ्यांचा सत्कार करुन जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी श्री लक्ष्य स्कूलचे संस्थापक अध्यक्ष विशाल माळी, सचिव, मुख्याध्यापिका रुपाली लांडगे, उपमुख्याध्यापक विश्वनाथ गुरव, प्रशिक्षक सौरभ पाटील व शिक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते.