वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात ‘राष्ट्रीय शिक्षक दिन’ उत्साहात
तासगाव, बुधवार दि.7 सप्टेंबर 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) समाजाची जडणघडण शिक्षकांमुळेच होते शिक्षक समाजाचा आरसा असतो असे उद्गार प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय, तासगाव येथे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात बोलताना काढले. ते पुढे म्हणाले शिक्षकांनी देश घडवला शिक्षकांचा आदर्श विद्यार्थी घेत असतात त्यांचे अनुकरण करतात त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी वाढते. विद्यार्थी पुढे जाऊन मोठे व्हावेत यासाठी शिक्षक प्रामाणिक प्रयत्न करत असतात म्हणूनच विद्यार्थी शिक्षकांच्या भूमिकेशी एकरूप होतात. आई – वडील आणि शिक्षक विद्यार्थ्यांची काळजी घेतात हे सांगून शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांनी आपल्या विविध संस्कारकेंद्रातून विद्यार्थ्यांच्यात सुसंस्कार रुजविल्याचे सांगितले. आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थी सर्वगुण संपन्न होण्यासाठी महाविद्यालयात राबविलेल्या विविध उपक्रमाबद्दल त्यांनी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी एक दिवस महाविद्यालय चालवून अनोख्या पद्धतीने शिक्षक दिन साजरा केला. प्राचार्या पासून शिपायापर्यंत सर्व भूमिका नेटकेपणाने पार पाडल्या आणि त्यांचे अनुभव कथन केले. प्राचार्य म्हणून कु.रितू खरात तर उपप्राचार्य कु.सानिका पवार आणि मोहम्मदकैफ आलास्कर यांनी भूमिका पार पडल्या. सांस्कृतिक विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले होते. महाविद्यालयातील विविध विभागात ‘शिक्षक दिन’ साजरा केला. सर्व प्राध्यापकांचा गुलाब पुष्प आणि रोप देवून सन्मान केला. प्रास्ताविक कु.उज्मा मुजावर हिने केले तर आभार कु.आराधना पांढरे हिने मानले. सूत्रसंचालन कु.सानिया मुलाणी आणि कु. सुनिता हेळवी यांनी केले. यावेळी उपप्राचार्य जे.ए.यादव, प्रा.के.एस.गायकवाड, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.आण्णासाहेब बागल, प्रा.डी.व्ही.पाटील, कार्यक्रम कमिटी प्रमुख डॉ.साईनाथ घोगरे, डॉ.अमोल सोनवले, डॉ.विनोदकुमार कुंभार, डॉ.सुनिल गावीत, प्रा.ए.एस. सुतार, प्रा. सौ.एस.बी. पाटील, प्रा.एफ.बी.वलांडकर, प्रा.एस.पी.कोळपकर यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
