शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या स्वप्नातील विद्यार्थी घडवूया – प्राचार्य डॉ.महेश गायकवाड

पी.डी.व्ही.पी. महाविद्यालयाची संस्थांतर्गत पथक तपासणी व शाळासिद्धी मूल्यांकन

तासगाव, दि.२८ जानेवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा)

पदमभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय गुणवत्तेची खाण आहे. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या स्वप्नातील विद्यार्थी घडवूया असे उद्गार शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराडचे प्राचार्य डॉ.महेश गायकवाड यांनी पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे संस्थांतर्गत पथक तपासणी व शाळासिद्धी मूल्यांकन तपासणी सहविचार सभेत बोलताना काढले.ते पुढे म्हणाले शिक्षणातील नवे बदल स्विकारून गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले पाहिजे. विद्यासमिती हा संस्थेचा आत्मा आहे.महाविद्यालयाची कामगिरी आदर्शवत असून समृद्ध ग्रंथालय , शिस्त , स्वच्छता या गोष्टी वाखाण्याजोग्या असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी सर्व कमिटीचे स्वागत करून महाविद्यालयाचा धावता आढावा घेतला. यावेळी प्रा. सुरेश रजपूत यांनी आपल्या मनोगतामधून येथील विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.या पथक तपासणीसाठी प्रा.आर.बी.भिसे , प्रा.वाय.व्ही.पाटील , प्रा.आर. एस.जाधव ,प्रा.एस. व्ही.अवघडे ,प्रा.आर.डी. पाटील , प्रा.व्ही.एस.घोडके यांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्युनिअर विभागप्रमुख प्रा.एस.डी. पाटील यांनी यांनी केले तर आभार प्रा.डी.एन.यादव – पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आण्णासाहेब बागल यांनी केले. कार्यक्रमाला विज्ञान विभागप्रमुख प्रा.के.एस. गायकवाड , महाविद्यालयातील प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.