शिवस्पंदन गायन स्पर्धेत सिद्धी गरड प्रथम

तासगाव, दि.28 मार्च 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या शिवस्पंदन सुगम गायन स्पर्धेत सांगलीच्या सिद्धी सुरेश गरड हिने प्रथम क्रमांक पटकावून आपल्या यशाच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला. सिद्धी सध्या एम. एस.सी. मध्ये शिकत असून सांगली जिल्ह्याचे अष्टपैलू कलाकार- पत्रकार सुरेश गरड यांची कन्या आहे. तिने लहानपणापासूनच विविध क्षेत्रात अनेक पारितोषिके पटकावून लौकिक मिळवला आहे. सध्या ती तिचे वडील सुरेश गरड यांच्याकडे संगीताचे प्रशिक्षण घेत आहे. सिद्धीच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.