शिवाजी विद्यानिकेत मध्ये रक्षाबंधन उत्साहात

वाळवा, गुरुवार दि.31 ऑगस्ट 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) श्री छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन पेठ, ता. वाळवा या निवासी संकुल शाळेत रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. शालेय विद्यार्थ्यांना मुलींनी राखी बांधून हार्दिक पारंपरिक सन साजरा केला. यावेळी संस्थेचे संस्थापक जयंत पाटील, मुख्याध्यपक जयंवत बोबडे, उपमुख्याध्यापक सविता माळी, वसतीगृह अधिक्षक अमोल पवार तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.