तासगाव, दि.19 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथील जिल्हा परिषद शाळा नं. 2 ची विद्यार्थिनी कार्तिकी सोमनाथ साळुंखे हिने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत महाराष्ट्र राज्यात सहावा तर सांगली जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. कार्तिकी हिच्या याच्याबद्दल विविध सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक करून सत्कार केला. कार्तिकी साळुंखे हिने 5 वी शिष्यवृत्ती परीक्षेत 300 पैकी 278 गुण प्राप्त करून सांगली जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. तर राज्य गुणवत्ता यादीत सहावा क्रमांक पटकावला. जिल्हा परिषद शाळेची राज्य गुणवत्ता यादीत येणारी गावातील पहिली विद्यार्थिनी आहे. कार्तिकी हिला वर्गशिक्षिका भक्तीप्रिया कांबळे, मुख्याध्यापिका सुजाता भोसले, प्रभारी मुख्याध्यापिका सुमन माळी वडील प्रा. सोमनाथ साळुंखे, आई मीनाक्षी साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्हा परिषद शाळा नं 2 येथे केंद्रप्रमुख वंदना कदम, मुख्याध्यापक सुजाता भोसले, सर्व शिक्षक वर्गाच्या वतीने गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. कार्तिकी साळुंखे हिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे. विविध सामाजिक संस्था व संघटनेच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला.
