श्री लक्ष्य स्कुलच्या खेळाडूंची राष्ट्रीय थाय-बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

मणेराजुरी, रविवार दि.6 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथील शैक्षणिक गुणवत्ते बरोबर क्रिडा क्षेत्रात नेहमीच अग्रेसर लक्ष्य ॲकॅडमी सैनिक पॅटर्न स्कुल व ज्यु.कॉलेज,येथील विदयार्थ्यांनी ‘छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे झालेल्या राज्यस्तरीय थाय-बॉक्सिंग स्पर्धेत सांगली जिल्ह्याचे नेतृत्व करत एकुण 11 पदके मिळवली. या खेळाडूंची ‘भुवनेश्वर येथे होणाचा राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत यशस्वी झालेली विद्यार्थी पुढीलप्रमाणे जयराज गुख (सुवर्ण पदक), साईराज जाधव (सुवर्ण पदक), साईनाथ इंगोले (सुवर्ण पदक) ईशान माळी (रौप्य पदक), चैतन्य लठ्ठे (रौप्य पदक), अथर्व शिंदे (रौप्य पदक), शौर्य माळी (रौप्य पदक), वरद पवार (कास्य पदक), आदर्श बर्गे (कास्य पदक), ओंकार जाधव (कास्य पदक), प्रज्ज्वलू कदम (कास्य पदक) यशस्वी खेळाडूंना सांगली जिल्हा थाय-बॉक्सिंग चे अध्याय विशाल माळी सर, श्री लक्ष्य स्कुलचे सचिव मुख्याध्यापक रुपाली लांडगे मॅडम, व उपमुख्याध्यापक विश्वनाथ गुरव सर, इनचार्ज विजय माळी सर, प्रशिक्षक सौरभ पाटील सर आणि शिक्षक स्टाफ व इतर कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.