स्वतःच्या मुलाची उमेदवारी हिरावून घेणारा नेता जनतेसाठी काय लढणार विशाल पाटील यांचा माजी खासदार यांच्यावर सडकून टीका
तासगाव, दि. 24 ऑक्टॉबर 2024 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा) – ”सत्तेचा माज आलेला नेता आता विधानसभेनंतर तासगावची नगरपरिषद लढेल. जो स्वार्थासाठी स्वतःच्या पोराला बाजूला करतो तो जनतेसाठी काय लढणार? अशा भुताला गाढण्यासाठी आपण सर्व एकत्र आलो आहोत, त्याला पुन्हा डोके वर काढू देणार नाही. सांगली जिल्ह्यात सत्तेचा माजलेला एक नेता निर्माण झाला होता. जनतेने सत्ता काढून घेतल्यानंतर ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. काहीतरी करून पुन्हा सत्ता काबीज करायची या भावनेने ते आता आमदारकी लढत आहेत. येथील पराभवानंतर कदाचित तासगावची नगरपरिषद देखील लढतील. सोळा वर्षे आमदार, दोन वेळा खासदार, पण सत्तेत राहून सुद्धा जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकलेल्या नाहीत. दुसऱ्याने केलेल्या कामावर स्वतःला नाव जोडायची वेळ येते. त्यामुळे संजय काका पाटील सत्तेसाठी विधानसभा लढत आहेत” अशा शब्दांत खासदार विशाल पाटील यांनी माध्यमांशी बोलताना माजी खासदार संजय पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.
