संजय राऊत यांचे गटनेते पद धोक्यात ?

नवी दिल्ली, दि.२१ फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृतसेवा) शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्षाचे अधिकृत चिन्ह धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मिळाल्या नंतर शिंदे गटाच्या नेत्यांनी शिवसेनेच्या विधीमंडळातील कार्यालयावरही ताबा घेतला. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या या निर्णयानंतर शिंदे गटाचा आत्मविश्वास वाढला आहे. विधिमंडळ कार्यालयानंतर शिंदे गटाने खासदार संजय राऊत यांच्याकडे मोर्चा वळवला आहे. राऊतांचे शिवसेनेचे संसदीय मुख्य नेतेपद काढून घेतले जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वत: तसे संकेत पुण्यातील एका पत्रकार परिषदेत दिले आहेत. सत्ता संघर्षातील गेल्या काही दिवसात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिंदे गटारातील आमदारावर अतिशय घालच्या शब्दात टीका केली आहे. त्यामुळे राऊत यांच्या टीकामुळे दुखावलेल्या मुख्यमंत्री शिंदेनी खासदार संजय राऊत यांच्या विरोधात त्यांचे मुख्यनेते पद काढून घेण्याचा निर्णय असल्याचे सांगितले जात आहे. संजय राऊतांचं मुख्य नेतेपद काढून घेतल्यानंतर त्यांच्या जागी खासदार गजानन कीर्तीकर यांची मुख्य नेते पदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. विधीमंडळ पक्षानंतर आता संसदीय पक्ष शिंदेंकडे जाणार आहे. त्याच बरोबर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शिवसेना पक्षाचा फंड वापरण्याचीही परवानगी एकनाथ शिंदे यांना मिळाली आहे. शिवसेना पक्षाकडे तब्बल 148 कोटी रुपयांची FD आणि 186 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. एकनाथ शिंदे गटाला नाव आणि पक्ष चिन्ह सह मालमत्ता आणि डिपॉझिट रक्कम वापरण्यासही निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे यांच्या समोरील अडचणीत वाढ होत आहे