अरण येथे सर्वात उंच वारकरी ध्वजाचे लोकार्पण

सोलापूर, दि. ६ फेब्रुवारी २०२३ (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा)
महाराष्ट्र हा साधू, संत, महंत महापुरुषांची भूमी आहे. युगाने युगे चालत आलेली संत वारकऱ्यांची परंपरा हीच खरी महाराष्ट्राची ओळख आहे. असे प्रतिपादन आ. रोहित पवार यांची केले. अरण ता.माढा येथे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या सोलापूर जिल्ह्यातील सर्वात उंच वारकरी ध्वजाचा लोकार्पण सोहळा करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
यावेळी सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे, आ.बबनदादा शिंदे, भारत शिंदे, शिवाजी कांबळे, सरपंच सुरत्नप्रभा ताकतोडे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विजय शिंदे, नागेश फाटे, शंकरराव वाघमारे, रमेश बारस्कर, नामदेव देवा राऊत, ह.भ.प.रमेश महाराज वसेकर, ह.भ.प.रविकात महाराज वसेकर, काँग्रेसचे संग्राम जाधव, सावता परिषदेचे पदाधिकारी प्रदेशाध्यक्ष मयूर वैद्य, प्रदेश प्रक्ते राजीव काळे, प्रदेश मुख्य संघटक संतोष राजगुरू, गणेश दळवी, मनीषा सोनमाळी, महादेव ताटे, साधना राऊत, जोरे मामा, स्वप्निल कोद्रे, गोरक्ष भुजबळ, विष्णूपंत खेत्रे, शिवाजी येवारे, मृदुल माळी, सयाजी बनसोडे, डॉ.योगेश रणदिवे, सिताराम रणदिवे आदीसह सांप्रदायिक क्षेत्रातील महाराज मंडळी, वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. पवार म्हणाले, अरणमध्ये आज जो सर्वात उंच वारकरी ध्वज उभारला आहे. त्यात माझे सर्व श्रेय नसून माझ्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील लोकांचा मोठा सहभाग आहे.अरणही संत सावता महाराजांची जन्म,कर्मभूमी आणि संजीवन समाधी आहे.आता कल्याण आखाडे व सर्वांना बरोबर घेऊन अरणच्या विकासासाठी पुढाकार घेणार आहे. सरकारच्या निधीची वाट न बघता येथील विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. आजच्या वारकरी ध्वजाने अरणच्या विकासाची सुरुवात केली. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून संतांचे विचार हे वारकरी संप्रदायामुळे आजही टिकून आहेत. ते विचार पुढे नेण्याची गरज आहे. सावता महाराजांची विचार आचरणात आणण्याची गरज आहे. भक्ती कशी असावी हे संत सावता माळी यांच्याकडे पाहिल्यानंतर समजून येते. आजही पांडुरंगाची पालखी सावता माळी यांच्या भेटीला येते हे विशेष आहे. महान संत असतील किंवा महापुरुष असतील यांच्या विरोधात जे बोलतील त्यांना तिथेच समजावले पाहिजे. प्रसंगी आपण सर्वांनी लढा दिला पाहिजे.
यावेळी बोलताना माढा विधानसभेचे आमदार बबनदादा शिंदे म्हणाले की, अरणच्या विकासासाठी मी प्रयत्नशील आहे. भक्तनिवास बांधले आहे. अन्नछत्र सुरू केले आहे. विकास कामासाठी जमीन अधिग्रहण करणे गरजेचे आहे ते येत्या काळात करू,असे आश्वासन आ. शिंदे यांनी दिले. यावेळी मयूर वद्य, शंकरराव वाघमारे, राजीव काळे, ह.भ.प रमेश महाराज वसेकर, यावेळी सावता महाराजांच्या समाधी स्थळापासून ते कार्यक्रमाच्या ठिकाणपर्यंत ज्या ठिकाणी ध्वज उभा करण्यात आला आहे त्या ठिकाण पर्यंत ध्वज दिंडी काढण्यात आली. यानंतर ध्वजवंदन करण्यात आले.संतोष राजगुरू यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावता परिषदेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष मनीषा सोनमाळी यांनी केले. तर आभार कर्जतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव देवा राऊत यांनी मांनले.
अरणचा विकास हाच सावता परिषदेचा मुख्य उद्देश आहे.अरण येथे सर्वात उंच वारकरी ध्वज उभा केल्याबद्दल महाराष्ट्राचे युवा नेतृत्व आ.रोहित दादा यांचे आभार मानतो. येणाऱ्या काळात आपण अरणच्या विकास कामाबाबत लक्ष द्यावे. इतर तीर्थक्षेत्राप्रमाणे अरणचाही विकास व्हावा ही आमची इच्छा आहे.आम्ही तुमच्या खांद्याला खांदा देऊन साथ देऊ असे आव्हान सावता परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी केले. यावेळी सावता महाराजांच्या समाधी स्थळापासून ते कार्यक्रमाच्या ठिकाणपर्यंत ज्या ठिकाणी ध्वज उभा करण्यात आला आहे त्या ठिकाण पर्यंत ध्वज दिंडी काढण्यात आली. यानंतर ध्वजवंदन करण्यात आले.